ATL Community Week 2026
काल पासून सुरू झालेल्या, *ATL Community Week* येथे गेलो असता, खूप सुंदर अनुभव आला. Delhi Public School ने मला *Chief Guest* म्हणून बोलावले होते. येथे मला किमान 25 मिनिट्स चे speech द्यायचे होते. Ribbon cutting इत्यादी. पण ह्यापेक्षा सर्वात महत्वाचे म्हणजे प्रोजेक्ट judgement आणि नवीन पिढी कडून शिकता व समजून घेता येतील असे अद्वितीय अनुभव.
खरोखर नवी पिढी खूप आशादायी आहे. आणि Govt. त्यांच्या स्वप्नांना इतक्या चांगल्या पद्धतीने खात पाणी देत आहे हे पाहून थक्क राहायला झाले.
माझ्याहून 20 पटीने अस्खलित इंग्रजी, भाषा प्रभुत्व आणि इयत्ता सहावी सातवीत तिशी च्या आसपास ची प्रगल्भता. ही मुले उद्योजकासारखी pitch सुद्धा देऊ शकत होती. तरी ही बाब खरोखर प्रतसाहनात्मक आहे.
माझा प्रवास.
मी काही तामिळीयन startups वाल्या लोकांबरोबर फिरत असता त्यांच्यातील एका अती अनुभवी माणसाने मला हा *Mentor of Change* चा form भरावयास सांगितले नंतर समोरून काहीच response नाही. तरी अंदाजे दीड एक वर्षाने, 20 Feb 2020 रोजी Mentor of Change हे पद मिळाले. त्यानंतर Army Institute of Technology आणि पुढे Kendriya Vidyalaya अश्या काही ठिकाणी अतिशय हुषार मुलांना robotics project, LEGO project मध्ये guide करता आले. शाळांमध्ये फोन, फोटो व्हिडिओ allowed नसतात. व मला स्वतः ला ही फार फोटो ची हौस नाही तरी फोटो ATL Incharge व team कडे असूच शकतात. मी ते मागण्याच्या फंदात पडलो नाही.
त्यापुढे अंदाजे 5 वर्षे 6 महिन्यांनी Regional Mentor of Change (Maharashtra राज्य) साठी 3 Jul 2025 रोजी दुसरी इनिंग सुरू झाली.
13 Apr ते 17 Apr Dr. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती मध्ये यंदाचा ATL Community Week साजरा होत असताना, खरोखर Nation Building म्हणजे काय ह्याचा अनुभव घेत आहे. देशाची प्रगती ही नक्कीच अश्या सर्व कारणांनी होणार आहे.
ह्या सर्वात आदरणीय ATL Incharge, शाळेचे principals आणि team चे कष्ट आणि इच्छा ही प्रेरक आहे.
आपला,
अजिंक्य अजित देशपांडे
RMoC महाराष्ट्र राज्य
ATL AIM NITI AAYOG
ATL Community Week 2026
Reviewed by ADCORP
on
7:50 AM
Rating:
Reviewed by ADCORP
on
7:50 AM
Rating:








No comments
Post a Comment